Monday, March 6, 2017

8 सर्वोत्तम अँड्रॉइड अँप्स ज्याद्वारे तंत्रस्नेही शिक्षकांना स्वतःला सर्वोत्तम ज्ञान मिळवता येईल


Mlearning म्हणजेच मोबाईल learning हे आता काळाची गरज झालेय. आतापर्यंत आपण खूप छान असे तंत्रस्नेही प्रशिक्षण घेतलय पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली नाहीत. अँड्रॉइड अँप्स आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देऊन समृद्ध करतील. या अँप्स मधील कोर्सेस आपल्याला ट्रक भरून व्हिडिओस देतात ज्यात कॉम्पुटर प्रोग्रामिंग व अन्य कोडींग तसेच music व्हिडिओस नवीन तंत्र माहिती याचा खजिना आहे जो शिक्षकाला एक प्रोफेशनल म्हणून समृद्ध करतो.चला तर आवडेल तो कोर्स निवडा व पाहिजे तेव्हा शिका व बना एक जागतिक स्तरावरील प्रोफेशनल....

👨🏻‍💻1) Edx - edx

तुम्हाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या कोर्सेस ला डायरेक्ट ऍक्सेस मिळवून देतो. तर शिका हॊवर्ड mit uc बर्कले या विद्यापीठातील तंत्र कोर्सेस तेही एका क्लिक वर.यात तुम्हाला कॉम्पुटर science मानसशास्त्र आहार माहिती नियोजन अंकशास्त्र संख्याशास्त्र व अशा हजारो कोर्सेस ची यादी मिळते.

👩‍💻2) coursera

हे अँप सुद्धा जगातील सर्वोत्तम कोर्सेस तुम्हाला पूर्ण करण्याची संधी देते. ज्यात संगीत व फोटोग्राफी विशेष कोर्सेस उपलब्ध आहेत.

👨🏻‍💻3) Udemy

उडेमी हे एक असे जागतिक व्यासपीठ आहे जिथे 13 लाख विद्यार्थी स्व अध्ययन करत आहेत आणि 40 हजार पेक्षा जास्त कोर्स तिथे उपलब्ध आहेत.इथे तुम्हाला त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात.

👩‍💻4) Lynda-online learning

तुम्हाला नेतृत्व विकसन शिकायचे असेल नाहीतर तुम्हाला एखादे अँप बनवायचे असेल किंवा एखादे software कसे काम करते हे पहायचे असेल. यात 3d animation पासून ग्राफिक design पर्यँत सर्व कोर्स आहेत.

👨🏻‍💻5) TED

टेड च्या माध्यमातून तुम्हच्या उत्सुकतेचा नवीन मार्ग दाखवा. 2000 पेक्षा जास्त एक्स्पर्ट टेड talk तुम्हाला इथे पाहायला मिळतात. भविष्यातील तंत्राची झलक पाहून तुम्ही विस्मयचकित व्हाल.

👩‍💻6) Treehouse

ट्री house एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वेब डिजाईन पासून html css , mobile development through coding apps, java iphone apps, php and python व व्यावसायिक कौशल्य. हे सर्व शिकता येईल तेही मोबाईल मध्ये.

👨🏻‍💻7) -Udacity- Learn programming
बेसिक ते ऍडव्हान्स प्रोग्रामिंग शिकण्याचे हक्काचे ठीकाण हे वरील अँप आहे. व हे तुम्हाला फेसबुक व तत्सम मोठ्या tech कंपनीत काम करणारे तज्ज्ञ हे शिकवतात.

👩‍💻8) Linkedln Learning

नेतृत्व व्यापार कौशल्य व इतर तंत्र कौशल्य शिकण्यासाठी हे अँप उपयोगी आहे. प्रोग्रामिंग पासून 3d animation पर्यँत सर्व काही शिकता येईल.


चला तर मग शिकुया ह्या अँप्स च्या मदतीने....

✍लेखन :- आनंद आनेमवाड
           DIEPCD पालघर
📞9890697966
👨🏻‍💻ब्लॉग :- Blended e-learning
👨🏻‍💻youtube channel:- marathi techguru

महाराष्ट्र admin पॅनल आयोजित तंत्रस्नेही शिक्षक संमेलन लवकरच......

🔰🔰🔰🔰Ⓜ🅰🅿🔰🔰🔰🔰

पहिली प्रवेश



इयत्ता पहिली नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी  


🌺 हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी
१)टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२)गादीवर कोलांट्या उड्या
३)झोका खेळणे
४)एका पायावर तोलणे
५)शांत संगीतावर हलचाल
६)तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७)सरळ रेषेत कागद फाडणे
८)घडी घालून कागद फाडणे

🄨िर्णयक्षमता विकसनासाठी
९)ठसेकाम
१॰)बाटल्या,बरण्यांची झाकणे काढणे लावणे
११)बाटलीत बरणीत माती भरणे
१२)कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता ,बोटांना वळण लावण्यासाठी)

समजपूर्वक ऐकण्यासाठी
१३)गाणी गोष्टी ऐकवणे
१४)टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५)एका वाक्याची सूचना देणे
१६)छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७)मातीकाम
१८)धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९)दोर्‍यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰)खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१)मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२)वेणी घालणे
२३)आकार काढुन बिया,खडे लावणे
२४)वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारण
२५)एक काम१५ मिनिटांसाठी  देवून बैठक वाढवण्यास मदत
   वरील सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला निर्णयक्षमता विकसनास मदत होते .

🌺🌺🌺🌺🌺🌺

एक मार्च ते एक मे या कालावधीतच नविन पहीली शाळेत येणार आहे .झाली का तयारी त्यांच्याशी खेळण्याची

या मुलांना स्नायु विकसीत होतील असे खेळ '
' गोलाकार उभे राहून मुक्त हालचाली
उलटे चालणे
कांदा फ़ोड
डोक्यावर वस्तू  ठवून चालणे
पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चालणे
फिरत्या टायर बरोबर फिरणे
उंच उडी .
लांब उडी .
दोर उडी .
गादीवर कोलांटी उडी .
दोरीवर चढणे .
घसरगुंडीवर चढणे उतरणे
एका पायावर उभे राहणे
एका हाताने चेंडू फेकणे
दोन्ही हातानी चेंडू झेलणे .
झोक्यावर बसून झोके घेणे
घडी काम
मातीकाम
लोकरीचा धावदारा घालणे
लेखन पूर्वतयारी
तीन बोटांचा वापर करून कागद बारीक फाडता येणे
सरळ रेषेत कागद फाडणे
खळ लावून चित्र  चिटकविणे.
 खडूने चित्र रंगविणे
भेंडी , बटाटा ' दोरा  ठशांतून चित्र काढणे .
बाटल्यांची टोपणे लावणे काढणे
तालावर सावकाश व भरभर हालचाल करणे
 बाटलीत माती भरणे ओतणे
कडधान्ये निवडणे
शेंगा सोलून दाणे काढणे .
पाणी गाळणे
गाणी _ बडबड गीते .
 विनोदी आशयाची गाणी ऐकवावीन . शक्यतो संगिता सह गाणी ऐकू या
 गोष्ट _ १० मिनीटाच्या भावविश्वाशी निगडीत गोष्ट ऐकविणे . मजेशीर गमतीदार गोष्टी .
नाटयीकरण ऐकविणे
 माहीती ऐकविणे -वर्तमानपत्र गावातील कार्यक्रम इ घटनावर चर्चा घ्यावी .ऐकवावी
श्रवण्
आवाज ऐकणे प्राणि वाहने पक्षी यांचे आवाज ऐकविणे .
आवाज काढायची संधी देणे .
आवाज निर्माण करणारी साधने वापरून आवाज ऐकवणे
उद्देश्य = आवाजातील साम्य भेद ओळखता येणे .
सूचना  -एका वेळी एक सूचना देणे .कृती करतात का बघणे शब्द ऐकणे _हेतू पूर्ण निवडक शब्द ऐकविणे .समान अक्षराने सुरु होणारे व शेवट होणारे शब्द
श्रवण्
आवाज ऐकणे प्राणि वाहने पक्षी यांचे आवाज ऐकविणे .आवाज काढायची संधी देणे .आवाज निर्माण करणारी साधने वापरून आवाज ऐकवणे
 मुले काय करणार _
१-ऐकलेले सोपे शब्द व वाक्य सांगणे
२_नविन शब्द छोटी वाक्ये बिनचूक बोलणे मोठी मुले व्यक्ती शिक्षक यांच्याबरोबर संभाषण करणे
छोटी व_ सोपी शब्दकोडी चित्र कोडी सोडविणे. गाणी म्हणण्यास संधी देणे चित्र व स्कू यांच्याबद्दल बोलता येणे .
गोष्टीतील विनोदी प्रसंग सांगता येणे
मुलांनी सूचना देणे
: गोष्टी क्रमवार सांगता येणे . चित्रक्रमवार लावता


✏पहिला मुद्दा मूल समजून घेणे
✏सगळीच मुलं सारखी नसतात
✏प्रत्येकात काही ना काही वेगळेपण आसतं हे निश्चित
✏कुवत बघून मुलाला आवडी प्रमाणं शिकू देणं
✏पालकांनी आपेक्षा करणं चुकीचं
✏मेन मुद्दा तुलना करूच नये
✏स्वत:हून शिकण्यास प्रोत्साहन देणं
✏शिक्षा म्हणून दूर ठेवणं
✏वाजवी पेक्षा सुविधा पुरवणं,भौतिक सुविधा देणं म्हणजे मुलं शिकतात हा समज चुकीचा