Friday, May 8, 2020

विद्यार्थी आधार नंबर update करण्याची सोपी पध्दत

सरल website वर, mobile वरून  विद्यार्थी आधार नंबर update  करण्याची सोपी पध्दत
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

पहिल्या पध्दतीत आपण विद्यार्थी आधार नंबर अपलोड करण्यासाठी एक्सेल डाऊनलोड करून त्यात माहिती भरून  त्याची CSV फाईल करुन अपलोड करतो.ही पध्दत ब-याच जणांना किचकट वाटते.
चला तर मग विद्यार्थी आधार डेटा भरण्याच्या दुस-या सोप्या पध्दतीची माहिती घेऊया.
सर्वप्रथम मोबाईल मधून Chrome browser मधून desktop site option निवडा व स्टुडंट पोर्टलला लाॅगिन करा.
त्यानंतर Student Entry या टॅबवर क्लिक करा.
यानंतर दिसणा-या  Update Student Details वर क्लिक करा.
यामध्ये माहिती भरण्यापूर्वी शेैक्षणिक वर्ष , ज्या इयत्तेतील विद्यार्थ्यांचा आधार डेटा अपडेट करायचा तो वर्ग , तुकडी इ. बाबी भरा व GO या बटणावर क्लिक करा.
यानंतर आपल्याला आपण निवडलेल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिसेल.
ज्या विद्यार्थ्याची आधार कार्डवरील माहिती भरायची आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाच्या ओळीतील  Update या बटणावर  क्लिक करा.
आता आपल्या समोर त्या विद्यार्थ्याची माहिती असलेला फाॅर्म ओपन होईल.
विद्यार्थी पहिलीत दाखल झाल्यावर सरलला नोंद करताना आपण जेवढी माहिती भरली असेल ती सर्व माहिती आपणास दिसेल. या माहिती मधील काही माहिती आपणास दुरुस्त करावयाची असेल किंवा अपूर्ण असेल तर ती क्रमाने दुरुस्त किंवा नवीन भरून पुढे जा.
आपणास दिसत असलेली माहीती अगोदरच भरलेली असेल त्यामध्ये काही बदल करायचा नसेल तर पुढे जा.
आपण विद्यार्थ्याचा अाधार डेटा भरण्यासाठी पुढील कृती करा.
👇👇👇
सदर फाॅर्म मध्ये आधार माहिती अपडेट करण्यासाठी आपणास सर्वप्रथम Contact No. या काॅलमध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा किंवा पालकांचा उपलब्ध नसेल तर वर्ग शिक्षकांचा मोबाईल नंबर भरावा. येथे मोबाईल नंबर भरल्याशिवाय इतर माहिती सेव्ह होणार नाही याची नोंद घ्या.तसेच त्याखाली दिसणा-या Caste या काॅलममध्ये विद्यार्थ्याची जात निवडा.हा काॅलमही रिकामा सोडू नका.
त्यानंतर फाॅर्मच्या खाली जा.
जेथे तुंम्हाला Aadhar Card Details असा भाग दिसेल तेथे आपणास विद्यार्थ्याचा आधार डेटा भरायचा आहे.
१. सर्वप्रथम दिसणा-या तीन रिकाम्या चाैकोनात चार -चार च्या टप्प्याने विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर भरा.
२.त्यानंतर खाली दिसणा-या नावांच्या तीन काॅलममध्ये आधार कार्डवर दिसत असेल तसे नाव , वडिलांचे नाव, आडनाव भरा.
३. यानंतर आधार कार्डवर असणारे Male / Female / Transgender यापैकी योग्य पर्य़ाय निवडा.
४.यानंतर जन्मतारीख या काॅलम मध्ये विद्यार्थ्याची जन्मतारीख भरायची आहे.ही भरताना आधार कार्डवर जर पूर्ण तारीख असेल तर पहिल्या काॅलममध्ये भरा. जर का फक्त वर्ष नोंद असेल तर दुस-या काॅलममध्ये फक्त वर्ष भरा.
सध्या आपण एवढ्याच कृती करून आधार डेटा अपडेट करायचा आहे.
यानंतर खाली दिसणा-या Save या बटणावर क्लिक करा.
यानंतर आपल्याला  Student
Record Updated Successfully असा मेसेज येईल. आपण भरलेली माहिती सेव्ह झाली आहे. यानंतर OK वर क्लिक करा.

आधार डेटा भरण्यासाठी एवढीच कृती करा. त्यानंतर आपण वर दिसणा-या Home या बटणावर क्लिक करा.
आपण परत मूळ पानावर याल. त्यानंतर आपण Report  वर क्लिक करा.नंतर
Status वर क्लिक करा.नंतर
Adhar status वर जाऊन आपण अपडेट केलेल्या विद्यार्थ्याचा आधार डेटा अपडेट झाल्याचे दिसेल.


 Youtube Video पाहण्यासाठी डाऊनलोड करा.










दररोज उपडेट होणारा ब्लॉगला अत्यावश्यक माहितीसाठी भेट द्या.

1 comment: